शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

मी माझा...


ही कविता मी पुढारी वर्तमानपत्रात वाचली होती. ती मला आवडली म्हणून इथं देत आहे.

मी माझा...

मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा
वाळकं पानसुद्धा गळताना
तन्मयतेने पाहणारा

माझ्या हसण्यावर जाऊ नका

माझ्या रुसण्यावर जाऊ नका
जरी मी तुमच्यात बसलो
तरी माझ्या असण्यावर जाऊ नका
मला पक्कं ठाऊक आहे
प्रत्येक गोष्टीला अंत आहे
म्हणूनच मी काही बोलत नाही
मी अगदी शांत आहे
लोकांच्यात वावरताना मी
माझा तोतया म्हणून वावरतो
कुणी माझं खरं रुप ओळखलं की,
माझ्यातला मी बावरतो.

कधी कधी......!!!!!!!!

                 कधी असही जगाव लागतं....खोट्या हास्याच्या पडद्या आड खरे दुःख लपवाव लागतं....
कर्तव्याच्या नावाखाली स्वतःला राबवाव....इतरांना आनंदी ठेवण्यासाठी डोळ्यातलं पाणी लपवाव
लागतं....खुप इच्छा असुन देखील नाही म्हणाव लागतं....खुप प्रेम असुन देखील नाही अस दाखवाव 
लागतं.... अस इतरांना हसवता हसवता कधी खुप रडाव लागतं....कधी कधी असही जगाव लागतं..!!!!!!

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१३

फ्रेशर्स पार्टी

                                                                फ्रेशर्स पार्टी

सध्या कॉलेजात फ्रेशर्स पार्टीचे नगारे वाजू लागले आहेत… कोलेजातला प्रत्येकजण फ्रेशर्स पार्टीच्या तयारीला लागला आहे . कुणी गाणे गाणार आहे,तर कुणी डान्स,नाटक करणार आहे….प्रत्येक जण जोमाने पूर्वतयारी करतो आहे. फिश फिश पौंड शोधण्यात सर्वच मग्न झाले आहेत….
एरव्ही जगाच्या पाठीवर सामाजिक,आर्थिक,राजकीय,सांस्कृतिक,साहित्य क्षेत्राचे ज्ञान मिळवण्यासाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या पत्रकारितेच्या विध्यार्थ्यांच्या तोंडात ""फ्रेशर्स पार्टी '''' हा शब्द मात्र लागोपाठ ऐकायला येतोय.
नेहमीच कॉलेजला दडी मारणारे विध्यार्थी देखील फ्रेशर्स पार्टीच्या तयारीसाठी स्वतःला वाहून घेत आहेत… कोलेजातल्या युवकांमध्ये काधीनाव्हे एव्हढा उत्साह संचारलाय… कॉलेजात पाय ठेवताच क्षणी ''फ्रेशर्स…. फ्रेशर्स…. फ्रेशर्स….''' हाच शब्द कानी पडतो आहे…
का??का??का??एवढा आटापिटा कशासाठी???? ६५ वर्षापूर्वी आपले सैनिक सीमेवर स्वातंत्र्यासाठी लढले ऱक्त सांडून आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले…. त्या शहिदांचे स्मरण म्हणून कधीतरी '''''''''शहीद दिवस'''''''''' साजरा केला का आम्ही युवकांनी??मुळात शहीद दिवस कधी असतो हेच आजचा तरुण विसरलाय… भगतसिंग,राजगुरू,सुखदेव अश्या असंख्य तरुण क्रांतिकारकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. आज तरुण '''क्रांतिदिन''' विसरलाय … टिळक, आगरकर,सुभाषचंद्र बोस,स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या हिंदुस्थानासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या वीरांचा हुतात्मा दिवस विसरलाय आजचा युवक…. ! आपल्या प्राणांचे बलिदान देऊन आपणास गुलामीतून मुक्त केले आणि आपल्याला श्वास घेण्यासाठी स्वातंत्र्य मिळवून दिले. अश्या वीर हुतात्म्यांचे स्मरण देखील आजचा युवक (आम्ही) करू इच्छित नाही हे मोठ दुर्दैव आहे…
फ्रेशर्स पार्टीसाठी १० दिवस पूर्वीपासून झटणारे आम्ही आज या महामानवांचे विचार आत्मसात करण्यासाठी का एक तासाचाही समारंभ आयोजित करू इच्छित नाही…फ्रेशर्स पार्टीसाठी जेव्हढा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे… तोच उत्साह देशकार्यासाठी का दाखवत नाही…????आज स्त्रियांचे रस्त्यावर फिरणे मुश्किल झालेय… समाजात विकृत भावना अधिकाधिक रूढ होत चाललीये… देश आर्थिक संकटात सापडलाय,दुष्काळाने शेतकरी खच्चून गेलाय,अशा परिस्थितीत देशाला एका व्ग्ल्या दिशेची गरज आहे,, स्वातंत्र्यासाठी सांडलेल्या रक्ताची जाण असणे आवश्यक आहे… हुतात्म्याची क्रांतीकारकांची आणि तत्त्वज्ञांच्या विचारांची जोड आपल्याला असेल तरच भारत पुढे जाईल…। मग जर आम्ही युवक फ्रेशर्स पार्टीत कुठल्यातरी गाण्यावर थिरकायच,नाटक करायची,फिश पौंड टाकून याची न त्याची उडवायची असा हा बहुमुल्य वेळ आणि ते काही दिवस फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली व्यर्थ घालवायचा,,,,
परंतु तोच वेळ जर स्त्री जर स्त्री सुरक्षेविषयी समाजात जनजागृती करण्यात घालवाव … पर्यावरण जागृती ,सेव वाटर,तसेच श्रम दान ,असे विविध समाजहिताचे उपक्रम राबवले तर नक्कीच देश प्रगतीसाठी आपण महत्वाचे योगदान देऊ शकू … याशिवाय अशा पार्ट्यांवर केला जाणारा खर्च गरीब आणि होतकरू विध्यार्थ्याच्या शिक्षणासाठी खर्च करु शकतो…


पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण डोक्यावर मिरवतोय …पण आपण लोकशाहीसाठी काय करतोय???,समाजाप्रती आपण पार्ट्या साजर्या करून कर्तव्य व्यक्त करोय हे कितपत बरोबर आहे ????नाव्विद्यार्थ्याचे स्वागतच करायचे असेल तर त्यांना आपण कशाप्रकारे समाजाभिमुख पत्रकारितेचे मुलभूत पैलू पटवून दिले हेच खरा त्यांचा स्वागत होईल….मला कुणाला दोषी ठरवायचं नाहीये …. परंतु आजच्या पुरोगामी महाराष्टात या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत… 

..................मयुरोदय...................!

शनिवार, २२ जून, २०१३

ते १ वर्ष पत्रकारितेचे………!


                                 हुश्श…!

                            पत्रकारितेच एक वर्ष अखेर अनेक चढ-उतारांच्या साक्षीने मावळल. आता चाहूल लागली ती द्वितीय वर्षाची…… 
                             पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुरूही झाला. बघता बघता प्रथम सत्रा  (1st sem )पाठोपाठ द्वितीय सत्रही  (2nd  sem )आटोपलं. दरम्यानच्या काळात माझ्या एम जी एम जर्नालीझम कॉलेज मध्ये अनेक चढ-उतार बघायला मिळाले. मुळात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाची सुरवातच मोठ्या धुमधडाक्यात अन उत्साहात  झाली. मग ते फ्रेशर पार्टी असो,नाहीतर जिमखान्याची पहिली प्रेस कॉन्फरन्स,भय्यू महाराजांचे व्याख्यान असो अथवा आ. सतीश चव्हाण यांच्याशी मुक्त संवाद किवा ,तृप्ति मेंडम सोबतची बिबिका मक्बरयाची अभ्यास् भेट   ( world Heriteg day study tur ) . किंवा अनेक आठवणी गुंफवून ठेवणारी जळगाव,कळंबची अविस्मरणीय ट्रीप….यांच्यासह प्रत्येक इवेन्टला आम्हा विध्यार्थ्यांनी खूप,खूप,खूपच मज्जा केली. या इवेन्टमधूनही जे शिकलो त्याच रिपोर्टिंगहि मने मेंडमला दाखवल. शिवाय गेस्ट लेक्चर आणि रेगुलर लेक्चरहि काळजीपूर्वक केले.एकंदरीतच परीक्षेच्या पूर्वार्धाचा काळ अतिशय उत्साहात पार पडला. 
                        मात्र 1stआणि  2 nd दोन्ही सेमिस्टरच्या वेळी नोटीस बोर्डवर वेळापत्रके झळकताच सर्व विद्यार्थ्यांची भाम्भेरी उडाली. सर्वच विद्यार्थी  गंभीर झाले.प्रत्येकजण आपापल्या परीने  थेरीचा अभ्यास करू लागला.  दरम्यानच्या काळात  पुस्तकी किड्यांचे प्रमाणही वाढले. नोट्सच्या देवाण घेवानीलाहि मोठा उत आला. जी लायब्ररी आजपर्यंत शांत शांत असायची ती या काळात BAMCJ  म्हणजेच   माझ्या बेंचंच्या विद्यार्थ्यांमुळे गजबजून गेली. सर्वच विद्यार्थी अभ्यासात मग्न……! आजवर जी पुस्तके मुलांच्या हातात दिसू लागली. अर्थातच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर परीक्षेची चिंता दिसू लागलि. नेहमी पुस्तके वाचा या शेळके  मेंडम च्या ओरडीला विध्यार्थिनी परीक्षे पुर्ति का होईना पण साद घातली रडत-पडत,घाइघाइने,,रट्टा मारून किवा जमेल तसा अभ्यास करत विद्यार्थ्यांनी कशी बशी परीक्षा दिली. तेव्हड्याच  घाई-घाईने सबमीशनही उरकले. अन सुट्ट्याही लागल्या. पाहता पाहता पत्रकारितेच्या पहिल्या वर्षाचा सुर्य असंख्य आठवणीने  अस्ताला जाऊ लागला. एका वर्षात अनेक चढ-उतार बघायला मिळाले. पत्रकारितेचा परिपूर्ण नाही पण किंचितसा अनुभव तर नक्कीच मिळाला.
                     . एका वर्षात काही नाही पण जिव्हाळ्याचे माणस ,मित्रामैत्राणि तर नक्कीच मिळाल्या मग तो माझे BAMCJ,चे संकेत ,योगेश ,शरद,नागेश ,नितेश ,कुरील ,अभी,राम,गौरव,विद्या,पूजा डोम,पूजा कड,निमिषा,योगिता,अविका,रेखा,नेहा पिंपळे,कोमल बिरादार  हे सर्व  वर्गमित्र असो किवा,MAMCJ वैभव,अप्पा,अनिल,सोहम,नागोराव,रवि,आहेरकर,अरविंद,सिद्धू  ,किवा 4th sem ,चे कमले पाटील.,एके,माही,कारके   सर्वच मित्र अगदी जीवाभावाचे मिळाले,शिवाय वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या  शेळके मेंडम,देशपांडे  मेंडम,लिखाणाची संधी देणारे आदरणीय  सुंदर लटपटे सर,तर नेहमीच प्रेरणा देणारे पोपटराव पवार,संदीप चिखले,अजीज तांबोळी, कुल्दीप माने सर,सगळ्यांचे  नेहमीच  मला मार्गदर्शन लाभले.
                        पण……याच काळात दोन  अभ्यासू  मार्गदर्शक आम्ही गमावले . ते म्हणजे तृप्ती मेड्म,आणि हेमंत रावते सर. Media Language,Electronic Media या विषयातले तज्ञ जाणकारांच आम्हाला जास्त वेळ मार्गदर्शन लाभल नाही हे दुर्दैवच… असो ………. 
                  एकंदरीतच हे पत्रकारितेच एक वर्ष फार आनंदात गेल भरपूर काही शिकायला मिळाल. शिवाय पत्रकारिता म्हणजे एक silyabus नाही. तर वाचन,असंख्य शब्दसाठा,साहित्य,राजकारण,सांस्कृतिक,इ क्षेत्रातला अभ्यास म्हणजे खरी पत्रकारिता असते.  silyabus हि एक अभ्यासाची ठरवून दिलेली चौकट आहे. 
असो….  आता वेध लागले ते द्वितीय वर्षाचे…अन 2nd सेम च्या रिझल्टचे……माझ्या सर्व मित्रांना रिझल्टसाठी लक्ष लक्ष शुभेच्या …सर्वांनिच च चांगल्या गुणांनी यश संपादन करावे  हीच इच्छा……. धन्यवाद ……!  लवकरच 3rd sem च्या रुपात पुन्हा एकदा दुसर्या वर्षाचा उदय होणार आहे ………!    

                                                                                                                                    ---- मयुर गव्हाणे