शुक्रवार, १४ मार्च, २०१४

केजरी‘वॉल

                                        भय्या केजरी‘वॉल’ गिरती क्यु नही?गिरेगी कैसे? अंबुजा सिमेंट से जो बनी है









लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी मुंबई दौ-यावर आलेल्या अरविंद केजरीवाल यांनी नरिमन पॉइंट इथं फंड मॅनेजर आणि स्टॉक ब्रोकर्सशी चर्चा केली. तेव्हा, अंबुजा सिमेंटचे माजी व्यवस्थापकीय संचालक अनिल सिंघवी यांनी त्यांच्यापुढे दोन पर्याय ठेवले होते. पंतप्रधानपदासाठी तुम्ही भाजप नेते नरेंद्र मोदींना निवडाल, की बसप नेत्या मायावतींना पसंती द्याल?, असा मार्मिक प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर, आधी काहीच न बोलणा-या केजरींनी शेवटी मोदींचं नाव घेतल्याचं समजतं.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात कुठल्याच आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, त्रिशंकू अवस्था निर्माण होईल, असं मत केजरीवाल यांनी गुंतवणूकदारांशी चर्चेदरम्यान व्यक्त केलं. त्याचाच आधार घेऊन, अशा परिस्थितीत देशाचा पंतप्रधान म्हणून तुम्ही कुणाला कौल द्याल, अशी विचारणा अनिल सिंघवींनी केली आणि केजरी काहीसे गोंधळले. मायावती की मोदी हे दोन पर्याय त्यांच्यापुढे ठेवण्यात आले होते. सुरुवातीला थेट उत्तर देण्यास त्यांनी बरीच टाळाटाळ केली. या दोघांपैकी कुणालाच निवडणार नाही, असं त्यांनी अगदी ठामपणे सांगितलं. पण नंतर त्यांनी मोदींना झुकतं माप दिल्याचं सिंघवी म्हणाले.

लोकसभा त्रिशंकू आहे, पण पंतप्रधान तर निवडावाच लागणार आहे, अशा परिस्थितीत काय करणार?, या प्रश्नावर केजरीवाल यांनी आपलं मत मोदींच्या पारड्यात टाकल्याची माहिती अनिल सिंघवी यांनी दिली. माझ्यावर उद्या बंदूक रोखली गेली, तरच मी मोदींना निवडेन, असा पवित्रा केजरींनी घेतला. पण नंतर, अगदीच नाइलाज असल्यास आपण मोदींचा पर्याय निवडू, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. या निवडीचं कुठलंही कारण त्यांनी दिलं नाही.

मंगळवार, २८ जानेवारी, २०१४

ऑस्कर

ऑस्कर 

            
                       जगात सिनेसृष्टीतील विशेषतः हॉलीवूड मधील सर्वात प्रसिद्ध पुरस्कार म्हणून ऑस्करला अनन्यसाधारण महत्व आहे. आगदी गल्लीबोळातही ऑस्कर ला गेलेल्या चित्रपटांची चर्चा रंगत असते. मात्र ऑस्कर पुरस्कार नेमकं काय आहे?हा पुरस्कार कोणत्या संस्थेतर्फे का आणि कशासाठी दिला जातो ?याची माहिती फार कमी लोकाना आहे. याविषयी आपण या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत.
               अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अन्ड सायन्स या संस्थेतर्फे हा ऑस्कर पुरस्कार सिनेसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. लुईस बी. मेयर यांनी या संस्थेची स्थापना केली सोबतच ऑस्कर पुरस्कारांचीहि सुरवात केली. पहिला ऑस्कर पुरस्कार ६मे १९२९ रोजी प्रदान करण्यात आला.

                -::::ऑस्कर या पुरस्कारांचे काही नियम खालील प्रमाणे::::-  

                 ****ओस्कर च्या नामांकनासाठी पाठवला जाणारा सिनेमा मागील  वर्षात अर्थातच १  जानेवारी आणि ३१ डिसेंबर या दरम्यान   प्रदर्शित झालेला असेल तरच तो पुरस्कारासाठी ग्राह्य धरला जातो.
                 ****सिनेमा हा कमीत कमी ४० मिनिट किवा त्या पेक्षा अधिक वेळाचा असावा,४० मिनिटा खालील  सिनेमा,माहितीपट ग्राह्य धरला जात नाही.
                 ****सिनेमांची प्रिंट ३५. एमएम आणि ७०. एमएम ची असावी. तसेच पूर्वी २४ फ्रेम/सेकंद किवा ४८फ्रेम/सेकंद असे सिनेमे या नामांकनासाठी पात्र होई कालांतराने या नियमात अमुलाग्र बदल करण्यात आले.
                 ****प्रोग्रेसिव्ह स्कॅन डिजिटल सिनेमा या मापक यंत्रणेनुसार याचे रीझोलुशन १२८०बाय७२० इतके असावे…
                 ****चित्रपट निर्मात्याने दिलेल्या तारखेपर्यंत सर्व नियमांची पूर्तता करून चित्रपट ऑनलाईंन पद्धतीने अकादमीकडे पाठवावा….

                -:::: निवडप्रक्रिया ::::- 

                  ऑस्कर पुरस्कारासाठी विविध विभागासाठी नामांकन संस्थेकडे दाखल झालेले असतात. संस्थेचे सहा हजार सदस्य संख्या आहे. या सहा हजार सदस्यीय समितीचे पुरस्कार निवडीसाठी मतदान घेतले जाते. हे सदस्य दरवर्षी ऑस्करचे  आकर्षक सुवर्ण चषक देण्यासाठी यातील पुरस्कर्ते निष्कर्षाच्या आधारे निवडतात,

                 -::::ऑस्कर पुरस्काराचे स्मृतिचिन्ह ::::-

                 ऑस्कर चषकाचे स्वरूप म्हणजे तो एक लहान पुतळा असतो. हे स्मृतिचिन्ह ब्रिटानिया धात्तू ,तांबे ,निकेल ,चांदी आणि २४ कॅरेट सोने अशा पंचधातुनी बनवण्यात येतो. या पुतळ्याची उंची  १३(१/२)इंच  वजन ८(१/२)पाउंड इतके असते. असे ५० स्मृतीचिन्ह बनवण्यासाठी जवळपास ३ ते ४ आठवड्यांचा    कालावधी लागतो. पंचधातुनी बनवण्यात येणारा हा धातू अतिशय प्रतिष्टेचा  समजला जातो.

           

                -::::ऑस्कर पुरस्कार सिनेसृष्टीत किती व कोणत्या विभागा नुसार दिले जातात  विभाग पुढील प्रमाणे ::::-

            
  • उत्कृष्ट अभिनेता मुख्य भूमिका 1928 पासून 
  • उत्कृष्ट अभिनेता सहाय्यक भूमिका 1936 पासून 
  • उत्कृष्ट अभिनेत्री  मुख्य भूमिका 1928 पासून 
  • उत्कृष्ट अभिनेत्री  सहाय्यक भूमिका 1936पासून 
  • उत्कृष्ट अनिमेटेड सिनेमा 2001पासून 
  • उत्कृष्ट  अनिमेटेड शोर्ट फिल्म    1931पासून 
  • उत्कृष्ट सिनेमेटोग्रफि  1928 पासून 
  • उत्कृष्ट वेशभूषाकार  1948 पासून 
  • उत्कृष्ट दिग्दर्शक  1928 पासून 
  • उत्कृष्ट डॉकुमेंट्री  1943 पासून 
  • उत्कृष्ट सिनेमा संपादन १९३४ पासून 
  • उत्कृष्ट परकीय भाषा सिनेमा  1947 पासून 

आणि इतर …………!




सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पहिले ऑस्कर एमिल जेनिंग्ज तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पहिले ऑस्कर जेनेट गेनर या अभिनेत्रीस मिळाला. 
प्रथम विशेष पुरस्कार वार्नर ब्रदर्स याला जॉझ सिंगर यास चित्रपट निर्मितीसाठी देण्यात आला. तर चार्ल्स चप्लिन यांना दि . सर्कस चित्रपटाच्या निर्मिती,लेखक,अभिनेते यासाठी देण्यात आला. 

प्रथमच मराठी वेशभूषाकार भानू अथ्थया यांना इ.स १९८२ मध्ये गांधी चित्रपटातील वेशभूषा संकल्पनेसाठी ऑस्कर मिळाला होता.