शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१३

शेवटी सचिनही माणूसच आहे!

डिसेंबर २०१२ला सचिन तेंडुलकरने एक दिवसीयक्रिकेटमधून निवृत्ती घेतली. हा दिवसतब्बल २२ वर्षं आणि ९१ दिवसांनंतर आला. या प्रदीर्घकाळात हा विक्रमादित्य ४६३ सामने, १८,४२३ धावा, ४९ शतकं, ९६अर्धशतकं, एकदिवसीय सामन्यातीलएकमेव द्विशतक, असे अनेक विक्रम काळाच्या पडद्यावर रेखाटूनगेलाय. सर डॉन ब्रॅडमन ज्याचे प्रशंसक होते,क्रिकेटवेड्या असलेल्या आपल्या देशात ज्याला देव मानलं जातं,ज्याची विकेट मिळवणं हे प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्नंअसतं आणि ज्याच्या काळाचे साक्षीदारअसल्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे,त्याची निवृत्ती मात्रआपल्याला म्हणावी तेवढी सलली नाही.माध्यमांचा लाडका असलेल्या सचिनबद्दल केवळ दखलघेण्यापलीकडेमाध्यमांनी कसलाही गाजावाजा केला नाही.त्याच्या संघ सहका-यांनाही त्याचा हा निर्णयधक्कादायक वाटला नाही.त्याच्या चाहत्यांनीही त्याला परत येण्याचंआवाहन केलं नाही. कुठे रडण्याचा आवाजआला नाही की उसासे टाकले गेलेनाहीत. ऐकू आले ते फक्त सुटकेचे, समाधानाचे

निःश्वाजस आणि एक कुजबूज, की सचिनचा निर्णययोग्यच आहे पण वेळ चुकली. असं का व्हावं?२०११ साली भारताने विश्वं कप जिंकल्यानंतरच

सचिनच्या निवृत्तीची चर्चा सुरूझाली होती. कारण त्यानंतरचत्याच्या खेळातला डौल कमी होत चालला होता. त्यानेकधी निवृत्ती घ्यावी,का घ्यावी, का न घ्यावी असे सल्ले देणं सुरुझालं होतं. सचिनवर आपण पराकोटीचं प्रेम केलंय हेकबूल करायला कोणालाच संकोच वाटणार नाही.आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावर त्यानेगेली तेवीस वर्षंआपल्याला आणि आपल्या देशाला एक आदर मिळवून दिला,हेही कोणी नाकारणार नाही.तो ज्या काळात खेळायला आला त्या काळापासून आजपर्यंतया देशाच्या क्रिकेटमधील प्रत्येकमहत्त्वाच्या घटनेला सचिनचा संदर्भ आहे. ‘टाइम’ साप्ताहिकानेयाचा एका लेखात अचूक उल्लेख केलाय.काय म्हटलंय त्यात?‘ज्या वेळी या ग्रहावरील प्रत्येकव्यक्तीवर काळ आपला प्रभाव गाजवतहोता त्या वेळी त्याने फक्त एकाच माणसाचा अपवादकेला. सचिनसमोर काळही जणू गोठला होता.आपल्याला चॅम्पियन्स मिळालेत, लीजंड्स मिळालेत-मिळतीलही, पण आपल्याला दुसरा सचिनमिळाला नाही, आणि कधीचमिळणारही नाही.ज्या वेळी सचिनपाकिस्तानला आपला पहिला सामना खेळायला गेला त्यावेळी शुमाकरहे नाव फॉर्म्युला-वन रेसशी जुळायचंबाकी होतं. लान्स आर्मस्ट्रॉंग अजून टूरडी फ्रान्सवर गेला नव्हता. पीटसॅम्प्रासने अद्याप एकही ग्रॅन्ड स्लॅम जिंकलेलंनव्हतं. ज्या वेळी सचिन ‘सचिन’ बनतहोता त्या वेळी जगाने रॉजर फेडररचंनावही ऐकलं नव्हतं.लिओनेल मेस्सी अद्याप रांगत होता. उसेन बोल्टजमैकाच्या गल्लीबोळांतून पळणारा एक मुलगा होता.बर्लिनची भिंतपडलेली नव्हती. रशियाचे तुकडे झालेनव्हते. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताचं अर्थशास्त्रबदलायचं अजून बाकी होतं.’‘टाइम’चा हा लेख समस्त भारतीयांची मानअभिमानाने ताठ व्हावी असाच आहे, पणत्याची वेळ चुकली. कारण मुळातसचिनचीच वेळ चुकली. त्याचवेळी ‘टाइम’लाही सांगावंसं वाटतं,की भारतीयजनता आता पूर्वीसारखी राहिली नाही.मायकेल शुमाकर यशस्वी होऊन निवृत्त झाला,पुन्हा परतला आणि अपयशी ठरून त्याला जावं लागलं.पीट सॅम्प्रासने योग्य वेळ साधतनिवृत्ती पत्करली. पण, सचिनने यातूनधडा घेतला नाही. त्यामुळेच तो निवृत्त झाल्यावरत्याच्या आजवरच्या कर्तृत्वाला साजेसा निरोप त्याच्या असंख्यचाहत्यांनी त्याला दिला नाही, हे कटू सत्यआहे.माजी फिरकी गोलंदाजइरापल्ली प्रसन्ना म्हणतात,‘सचिनच्या निवृत्तीने आता निवड मंडळाला हायसं वाटलंअसणार. त्याला एकदिवसीय सामन्यातूनवगळण्याची वेळ त्यांच्यावरआली नाही म्हणून त्यांना आनंदझाला असेल. तो खेळतराहिला असता आणि अपयशी ठरला असता तर संघावरचंओझं झाला असता.’ प्रसन्ना हे सारंसचिनच्या निवृत्तीनंतर बोलले तो भाग वेगळा, पणत्यांची ही टीका विक्रमादित्यसचिनसाठी नक्कीच क्लेशदायकहोती. पण, निवड समितीचे प्रमुखसंदीप पाटील यांनी पाकिस्तानदौ-यासाठी संघनिवडीच्या वेळी सचिनला ‘त्याचंसंघातील स्थान त्याने गृहीत धरू नये’,असा जो सौम्य शब्दांत सूचक इशारा दिला तो लक्षात घेता स्पष्टचहोतं, की सचिनला संघातूनवगळण्याची तयारी निवडसमितीने केली होती.या गोष्टीची दबक्या आवाजातझालेली चर्चाही तितकीचखरी होती. त्यामुळेच क्रिकेटचा देवमानल्या गेलेल्या, आपल्या चौकार-षट्कारांमध्ये अचूक टायमिंग साधणा-या आणि संघातील एक विचारी, समंजस,मार्गदर्शक अशी प्रतिमा असलेल्या सचिनचंनिवृत्तीबाबतचं टायमिंग का चुकलं, हा प्रश्नत्याच्या चाहत्यांना, क्रिकेट रसिकांना पडणं स्वाभाविक आहे.सचिनने निवृत्तीसाठी इतका वेळका घेतला आणि अजूनही कसोटीतूननिवृत्ती का घेतली नाही याचंएक कारण त्याचे जाहिरातदार आहेत, असंही सांगितलंजातंय. सचिन आज सतरा कंपन्यांच्या ब्रँडेडवस्तूंच्या जाहिराती करतोय. हा सारा शंभरकोटींच्या घरातला व्यवहार आहे. सचिनचं करारसंपण्याआधीच निवृत्त होणं या कंपन्यांना परवडणारंनाही. त्यामुळे खेळतराहण्यासाठी त्यांचा अप्रत्यक्ष दबाव सचिनवर असूशकतो, असंही काहींचं म्हणणं आहे.अर्थात कोणाचं काहीही म्हणणं असो,सचिनने आपल्या सर्वांना जे आनंदाचे क्षण दिलेत तेकधीच विसरता येणार नाहीत. ‘निवृत्तझाल्यानंतर चाहत्यांच्या मिळालेल्या संदेशाने आपण भारावलोयत,त्याचा आनंद आहे आणि डोळ्यांतपाणीही आहे,’ असं सचिनने म्हटलंय.तो असंही म्हणाला,की ‘एकदिवसीय क्रिकेटमधीलहे जादुई क्षण कायम माझ्यासोबत राहतील.’ तेआपल्याही सोबत राहणार आहेत. पणतरीही त्याच्या जाण्याने आज डोळ्यांतपाणी मात्र तरारलंनाही हेही तेवढंच खरं. कारणया देवाची वेळ चुकली.शेवटी सचिनही माणूसच आहे!

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१३

पोलिस हुतात्मा दिवस






                                            सर्वप्रथम पोलिस हुतात्मा दिनानिमित्त सर्व शहीद पोलिस बांधवाना माझ्या परिवार,मित्रमंडळी आणि तमाम भारत देश बांधवांतर्फे विनम्र अभिवादन…। 



                                            काल २१ ऑक्टोंबर म्हणजेच पोलिस हुतात्मा दिन.२१ ऑक्टोंबर १ ९ ५ ९ ला लद्दाख च्या सीमेवर भारत चीन युध्द झाले होते. तत्कालीन युद्धात आपल्या सी. आर. पि. एफ च्या १० जवानांनी चीनची आख्खी एक बटालियन रोखून धरली चीनी सैन्याला एक इंच सुद्धा आपल्या वतन काबीज करू दिला नाही.आणि त्या युद्धात लढणाऱ्या सर्व जवानांनी आपल्या साठी हौतात्म्य पत्करले… तेव्हापासून २1ऑक्टोंबर हा दिवस पोलिस शहीद दिवस संबोधला जातो.


                                            त्या सैनिकांनी शेवटपर्यंत झुंज दिली,रक्तरंजित युध्द लढले. दुर्दैवाने आज आपल्याला त्याच्या हौतात्म्याचा विसर पडलाआहे . काल वृत्तपत्रात,टीव्ही,फेसबुक इ. सामाजिक माध्यमांवर कुठेच मला पोलिस हुतात्मा दिवस असा उल्लेख आढळला नाही…
                                            एरव्ही तासनतास फेसबुकवर काही बाही फोटो शेअर करणारे अन च्याटिंग करणारे आपण युवक शहीद पोलिसांना ५ मिनिट देखील श्रद्धांजली वाहू शकलो नाही???एवढेच नव्हे तर समाजाचा आरसा,लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणाऱ्या आपण पत्रकारांनी देखील चार ओळींची बातमी देऊन शब्दसुमनांनी श्रद्धांजली वाहू शकलो नाही तथापि समाजाला देखील स्मरण करून दिले नाही…. पक्षश्रेष्टींच्या वाढदिवसानिमित्त किवा पुत्रांच्या लग्नावर बेसुमार खर्च करणारे ,फलक छापणारे , हजारोंच्या जाहिराती देणाऱ्रे ,मोठमोठ्या सभा आयोजित कंरनारे आपले नेते,लोकप्रतिनिधी एक आर्धा तासाची जाहीर स्मरण सभा आयोजित करू शकले नाहीत…. याशिवाय शाळा महाविद्यालयांमध्ये इतर पार्ट्या साजर्या केल्या जातात मग हुतात्मा दिनच का साजरा केला जाऊनायर नये?????




                               २६/११ च्या हल्ल्यात अन आताच पुंडलिक माने यांनी वीरमरण पत्करले…… या वर्षात ५७६ पोलिस जवान कर्तव्य बजावत असताना धारातीर्थी पडले…… त्या सर्व जवानांच्या शहादतीची किंमत आपल्या सर्वांना कळणे खूप गरजेचे आहे…… काल औरंगाबाद आयुक्तालयात पोलिस हुतात्म्यांना मानवंदना दिली तेव्हाचा फोटो वरती टाकला आहे…


                                शेवटी पुन्हा एकदा शहीद पोलिसांना मनापासून मानवंदना देतो…

              सांगायचं एवढच कि …………


                                     
  ए मेरे वतन के लोगो,
                                        जरा आखो मे भरलो पाणी,
                                        जो शहीद हुवे है उनकी
                                        जरा याद करो कुर्बानी,

                                जरा याद करो कुर्बानी…............……!


शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३

लेखणी बोले......


काहीतरी लिहायचे असे खूप दिवसापासून वाटतेय पण काय? कोणत्या? विषयावर भाष्य करायचे हे तर खूप अवघड काम आहे? असे आता वाटू लागले. कारण लेखणी बोलली कि तिच्यावर आक्षेप घ्यायला, तिचे तोंड दाबायला काही लोकं उभे असतात.
 असो, पण सुरवात काय आणि कोणत्या विषयावर करावी असे झाले आहे. अस प्रत्येकाच होत का? माहिती नाही, पण मला अस वाटू लागलं कि प्रत्येक क्षेत्रात पाउल ठेवणाऱ्या व्यक्तीचं असाच होत असणार, नाही समजल तर मग समजावून घेऊ. मी जेव्हा एखादी कथा, चारोळी, कविता, लेख असे जेव्हा वाचतो तेव्हा मला नेहमी वाटत कि मी जर हे लिहील असत तर,
जेव्हा एखादा चित्रपट पाहतो? तेव्हा नेहमी वाटत जर आपण हा चित्रपट लिहिला असता तर. यातली गाणी लिहिली असती तर, काय राव तुम्ही म्हणाल याला वेड-बीड लागलं कि काय. पण खर सांगू मित्रानो,आता मला पत्रकारितेला प्रवेश घेतल्यापासून लिहायलाच खूप आवडतय…. मी हल्ली खूप शांत शांत असतो. कारण आता मला निरीक्षण करायची सवय लागलीय… आणि  केलेलं तेच निरीक्षण कागदावर उतरवण्यासाठी मला माझी लेखणीच फक्त साथ देते फक्त आणि फक्त लेखणीच………………… !

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

मी माझा...


ही कविता मी पुढारी वर्तमानपत्रात वाचली होती. ती मला आवडली म्हणून इथं देत आहे.

मी माझा...

मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा
वाळकं पानसुद्धा गळताना
तन्मयतेने पाहणारा

माझ्या हसण्यावर जाऊ नका

माझ्या रुसण्यावर जाऊ नका
जरी मी तुमच्यात बसलो
तरी माझ्या असण्यावर जाऊ नका
मला पक्कं ठाऊक आहे
प्रत्येक गोष्टीला अंत आहे
म्हणूनच मी काही बोलत नाही
मी अगदी शांत आहे
लोकांच्यात वावरताना मी
माझा तोतया म्हणून वावरतो
कुणी माझं खरं रुप ओळखलं की,
माझ्यातला मी बावरतो.

कधी कधी......!!!!!!!!

                 कधी असही जगाव लागतं....खोट्या हास्याच्या पडद्या आड खरे दुःख लपवाव लागतं....
कर्तव्याच्या नावाखाली स्वतःला राबवाव....इतरांना आनंदी ठेवण्यासाठी डोळ्यातलं पाणी लपवाव
लागतं....खुप इच्छा असुन देखील नाही म्हणाव लागतं....खुप प्रेम असुन देखील नाही अस दाखवाव 
लागतं.... अस इतरांना हसवता हसवता कधी खुप रडाव लागतं....कधी कधी असही जगाव लागतं..!!!!!!

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१३

फ्रेशर्स पार्टी

                                                                फ्रेशर्स पार्टी

सध्या कॉलेजात फ्रेशर्स पार्टीचे नगारे वाजू लागले आहेत… कोलेजातला प्रत्येकजण फ्रेशर्स पार्टीच्या तयारीला लागला आहे . कुणी गाणे गाणार आहे,तर कुणी डान्स,नाटक करणार आहे….प्रत्येक जण जोमाने पूर्वतयारी करतो आहे. फिश फिश पौंड शोधण्यात सर्वच मग्न झाले आहेत….
एरव्ही जगाच्या पाठीवर सामाजिक,आर्थिक,राजकीय,सांस्कृतिक,साहित्य क्षेत्राचे ज्ञान मिळवण्यासाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या पत्रकारितेच्या विध्यार्थ्यांच्या तोंडात ""फ्रेशर्स पार्टी '''' हा शब्द मात्र लागोपाठ ऐकायला येतोय.
नेहमीच कॉलेजला दडी मारणारे विध्यार्थी देखील फ्रेशर्स पार्टीच्या तयारीसाठी स्वतःला वाहून घेत आहेत… कोलेजातल्या युवकांमध्ये काधीनाव्हे एव्हढा उत्साह संचारलाय… कॉलेजात पाय ठेवताच क्षणी ''फ्रेशर्स…. फ्रेशर्स…. फ्रेशर्स….''' हाच शब्द कानी पडतो आहे…
का??का??का??एवढा आटापिटा कशासाठी???? ६५ वर्षापूर्वी आपले सैनिक सीमेवर स्वातंत्र्यासाठी लढले ऱक्त सांडून आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले…. त्या शहिदांचे स्मरण म्हणून कधीतरी '''''''''शहीद दिवस'''''''''' साजरा केला का आम्ही युवकांनी??मुळात शहीद दिवस कधी असतो हेच आजचा तरुण विसरलाय… भगतसिंग,राजगुरू,सुखदेव अश्या असंख्य तरुण क्रांतिकारकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. आज तरुण '''क्रांतिदिन''' विसरलाय … टिळक, आगरकर,सुभाषचंद्र बोस,स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या हिंदुस्थानासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या वीरांचा हुतात्मा दिवस विसरलाय आजचा युवक…. ! आपल्या प्राणांचे बलिदान देऊन आपणास गुलामीतून मुक्त केले आणि आपल्याला श्वास घेण्यासाठी स्वातंत्र्य मिळवून दिले. अश्या वीर हुतात्म्यांचे स्मरण देखील आजचा युवक (आम्ही) करू इच्छित नाही हे मोठ दुर्दैव आहे…
फ्रेशर्स पार्टीसाठी १० दिवस पूर्वीपासून झटणारे आम्ही आज या महामानवांचे विचार आत्मसात करण्यासाठी का एक तासाचाही समारंभ आयोजित करू इच्छित नाही…फ्रेशर्स पार्टीसाठी जेव्हढा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे… तोच उत्साह देशकार्यासाठी का दाखवत नाही…????आज स्त्रियांचे रस्त्यावर फिरणे मुश्किल झालेय… समाजात विकृत भावना अधिकाधिक रूढ होत चाललीये… देश आर्थिक संकटात सापडलाय,दुष्काळाने शेतकरी खच्चून गेलाय,अशा परिस्थितीत देशाला एका व्ग्ल्या दिशेची गरज आहे,, स्वातंत्र्यासाठी सांडलेल्या रक्ताची जाण असणे आवश्यक आहे… हुतात्म्याची क्रांतीकारकांची आणि तत्त्वज्ञांच्या विचारांची जोड आपल्याला असेल तरच भारत पुढे जाईल…। मग जर आम्ही युवक फ्रेशर्स पार्टीत कुठल्यातरी गाण्यावर थिरकायच,नाटक करायची,फिश पौंड टाकून याची न त्याची उडवायची असा हा बहुमुल्य वेळ आणि ते काही दिवस फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली व्यर्थ घालवायचा,,,,
परंतु तोच वेळ जर स्त्री जर स्त्री सुरक्षेविषयी समाजात जनजागृती करण्यात घालवाव … पर्यावरण जागृती ,सेव वाटर,तसेच श्रम दान ,असे विविध समाजहिताचे उपक्रम राबवले तर नक्कीच देश प्रगतीसाठी आपण महत्वाचे योगदान देऊ शकू … याशिवाय अशा पार्ट्यांवर केला जाणारा खर्च गरीब आणि होतकरू विध्यार्थ्याच्या शिक्षणासाठी खर्च करु शकतो…


पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण डोक्यावर मिरवतोय …पण आपण लोकशाहीसाठी काय करतोय???,समाजाप्रती आपण पार्ट्या साजर्या करून कर्तव्य व्यक्त करोय हे कितपत बरोबर आहे ????नाव्विद्यार्थ्याचे स्वागतच करायचे असेल तर त्यांना आपण कशाप्रकारे समाजाभिमुख पत्रकारितेचे मुलभूत पैलू पटवून दिले हेच खरा त्यांचा स्वागत होईल….मला कुणाला दोषी ठरवायचं नाहीये …. परंतु आजच्या पुरोगामी महाराष्टात या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत… 

..................मयुरोदय...................!

शनिवार, २२ जून, २०१३

ते १ वर्ष पत्रकारितेचे………!


                                 हुश्श…!

                            पत्रकारितेच एक वर्ष अखेर अनेक चढ-उतारांच्या साक्षीने मावळल. आता चाहूल लागली ती द्वितीय वर्षाची…… 
                             पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुरूही झाला. बघता बघता प्रथम सत्रा  (1st sem )पाठोपाठ द्वितीय सत्रही  (2nd  sem )आटोपलं. दरम्यानच्या काळात माझ्या एम जी एम जर्नालीझम कॉलेज मध्ये अनेक चढ-उतार बघायला मिळाले. मुळात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाची सुरवातच मोठ्या धुमधडाक्यात अन उत्साहात  झाली. मग ते फ्रेशर पार्टी असो,नाहीतर जिमखान्याची पहिली प्रेस कॉन्फरन्स,भय्यू महाराजांचे व्याख्यान असो अथवा आ. सतीश चव्हाण यांच्याशी मुक्त संवाद किवा ,तृप्ति मेंडम सोबतची बिबिका मक्बरयाची अभ्यास् भेट   ( world Heriteg day study tur ) . किंवा अनेक आठवणी गुंफवून ठेवणारी जळगाव,कळंबची अविस्मरणीय ट्रीप….यांच्यासह प्रत्येक इवेन्टला आम्हा विध्यार्थ्यांनी खूप,खूप,खूपच मज्जा केली. या इवेन्टमधूनही जे शिकलो त्याच रिपोर्टिंगहि मने मेंडमला दाखवल. शिवाय गेस्ट लेक्चर आणि रेगुलर लेक्चरहि काळजीपूर्वक केले.एकंदरीतच परीक्षेच्या पूर्वार्धाचा काळ अतिशय उत्साहात पार पडला. 
                        मात्र 1stआणि  2 nd दोन्ही सेमिस्टरच्या वेळी नोटीस बोर्डवर वेळापत्रके झळकताच सर्व विद्यार्थ्यांची भाम्भेरी उडाली. सर्वच विद्यार्थी  गंभीर झाले.प्रत्येकजण आपापल्या परीने  थेरीचा अभ्यास करू लागला.  दरम्यानच्या काळात  पुस्तकी किड्यांचे प्रमाणही वाढले. नोट्सच्या देवाण घेवानीलाहि मोठा उत आला. जी लायब्ररी आजपर्यंत शांत शांत असायची ती या काळात BAMCJ  म्हणजेच   माझ्या बेंचंच्या विद्यार्थ्यांमुळे गजबजून गेली. सर्वच विद्यार्थी अभ्यासात मग्न……! आजवर जी पुस्तके मुलांच्या हातात दिसू लागली. अर्थातच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर परीक्षेची चिंता दिसू लागलि. नेहमी पुस्तके वाचा या शेळके  मेंडम च्या ओरडीला विध्यार्थिनी परीक्षे पुर्ति का होईना पण साद घातली रडत-पडत,घाइघाइने,,रट्टा मारून किवा जमेल तसा अभ्यास करत विद्यार्थ्यांनी कशी बशी परीक्षा दिली. तेव्हड्याच  घाई-घाईने सबमीशनही उरकले. अन सुट्ट्याही लागल्या. पाहता पाहता पत्रकारितेच्या पहिल्या वर्षाचा सुर्य असंख्य आठवणीने  अस्ताला जाऊ लागला. एका वर्षात अनेक चढ-उतार बघायला मिळाले. पत्रकारितेचा परिपूर्ण नाही पण किंचितसा अनुभव तर नक्कीच मिळाला.
                     . एका वर्षात काही नाही पण जिव्हाळ्याचे माणस ,मित्रामैत्राणि तर नक्कीच मिळाल्या मग तो माझे BAMCJ,चे संकेत ,योगेश ,शरद,नागेश ,नितेश ,कुरील ,अभी,राम,गौरव,विद्या,पूजा डोम,पूजा कड,निमिषा,योगिता,अविका,रेखा,नेहा पिंपळे,कोमल बिरादार  हे सर्व  वर्गमित्र असो किवा,MAMCJ वैभव,अप्पा,अनिल,सोहम,नागोराव,रवि,आहेरकर,अरविंद,सिद्धू  ,किवा 4th sem ,चे कमले पाटील.,एके,माही,कारके   सर्वच मित्र अगदी जीवाभावाचे मिळाले,शिवाय वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या  शेळके मेंडम,देशपांडे  मेंडम,लिखाणाची संधी देणारे आदरणीय  सुंदर लटपटे सर,तर नेहमीच प्रेरणा देणारे पोपटराव पवार,संदीप चिखले,अजीज तांबोळी, कुल्दीप माने सर,सगळ्यांचे  नेहमीच  मला मार्गदर्शन लाभले.
                        पण……याच काळात दोन  अभ्यासू  मार्गदर्शक आम्ही गमावले . ते म्हणजे तृप्ती मेड्म,आणि हेमंत रावते सर. Media Language,Electronic Media या विषयातले तज्ञ जाणकारांच आम्हाला जास्त वेळ मार्गदर्शन लाभल नाही हे दुर्दैवच… असो ………. 
                  एकंदरीतच हे पत्रकारितेच एक वर्ष फार आनंदात गेल भरपूर काही शिकायला मिळाल. शिवाय पत्रकारिता म्हणजे एक silyabus नाही. तर वाचन,असंख्य शब्दसाठा,साहित्य,राजकारण,सांस्कृतिक,इ क्षेत्रातला अभ्यास म्हणजे खरी पत्रकारिता असते.  silyabus हि एक अभ्यासाची ठरवून दिलेली चौकट आहे. 
असो….  आता वेध लागले ते द्वितीय वर्षाचे…अन 2nd सेम च्या रिझल्टचे……माझ्या सर्व मित्रांना रिझल्टसाठी लक्ष लक्ष शुभेच्या …सर्वांनिच च चांगल्या गुणांनी यश संपादन करावे  हीच इच्छा……. धन्यवाद ……!  लवकरच 3rd sem च्या रुपात पुन्हा एकदा दुसर्या वर्षाचा उदय होणार आहे ………!    

                                                                                                                                    ---- मयुर गव्हाणे